आजच्या काळात संगणकात काळाप्रमाणे खूप बदल झाले आहेत.संगणक एक नव्या उंचीवर जाऊन
पोहचला आहे.संगणकाचे काम सोपे करणारे अनेक प्रकाराची साधने आत्ता उपलब्ध झाली आहेत.त्या
साधनांनी संगणक अतिशय व्यापक स्वरूपात काम करू
लागला आहे.आत्ता पाहूया कोणती आहेत ती साधने ज्यांनी संगणकाचे काम सोपे केले आहे.
1) स्कॅनर – आज काल सर्व ठिकाणी वापरात येणारे हे
साधन आहे.ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन माहिती, ईतर ऑनलाईन काम करण्यासाठी स्कॅनरच्या मदतीने चित्र,
फोटो,मजकूर,इतर कागदपत्रे यांचे स्कॅन म्हणजेच फोटो
काढून संगणाकडे पाठवले जातात.
2) जॉय स्टिक- संगणकाच्या या युगात मैदानी खेळ बंद
पडलेले असताना संगणकावरील खेळांना खूप महत्व आले आहे किंवा नवीन पिढी संगणकाच्या वरील खेळांत
रममान झाली आहे या खेळात सुलभता व्हावी म्हणून हे
साधन वापरले जाते.जॉय स्टिक ही मुठीत मावेल अशी प्लॅस्टिकची दांडी असते.संगणकावर वेगवेगळे खेळ
खेळण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
3) वेब कॅमेरा – आधार कार्ड, यांसारख्या पासपोर्ट सारख्या गोष्टींसाठी वेब कॅमेरा वापरतात.ऑनलाईन फोटो घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
4) मायक्रोफोन- आपल्या आवाजाचे रेकॉर्डिंग करून ते
संगणकाला पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो.
5) बारकोड रीडर – आजकाल मॉल,पुस्तके,विविध प्रकाराच्या वस्तू यांवर बारकोड लावलेले असतात त्या
बारकोड चे वाचन करून त्याची माहिती जी असेल ती
वाचून संगणाकाकडे पाठवण्यासाठी याचा वापर केला जातो.
या सर्व साधनांचा वापर संगणक कामात केला जातो.म्हणून त्यांना संगणकाची साधने म्हणूनच ओळखले जाते.