
संगणक,संगणक माहिती, ज्या प्रमाणे माणसाला मेंदू असतो तसाच मेंदू संगणकाला पण असतो व त्यालाच आपण सी. पी. यू. म्हणू शकतो.तुम्ही विचाराल ईतका काय महत्वाचा भाग आहे का हा? तर हो असे उत्तर आहे.कारण सी.पी. यू. शिवाय संगणक अपूर्ण आहे.सी.पी. यू.नसेल तर संगणक हा केवळ टेलिव्हिजन होईल. म्हणजेच सी.पी. यू. हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे.हा आहे सी.पी. यू.
सी.पी. यू. चे तीन भाग पडतात.
1) ALU- या भागात संगणकावर आपण ज्या गणिती क्रिया करतो त्यांचे नियंत्रण या विभागाकडून करण्यात येते.उदा.बेरीज,कमी जास्त,तुलना, तार्किकी क्रिया ई.
2) कंट्रोल युनिट- ज्या प्रमाणे मेंदू मानवाच्या सर्व अवयांवर नियंत्रण ठेवतो त्याप्रमाणे हा भाग संगणकाच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवतो.म्हणजेच सुचनांप्रमाने कार्य होते का नाही हे पाहतो.
3) मेमरी युनिट- ज्या प्रमाणे मोबाईल मध्ये माहिती, डाटा साठवण्यासाठी मेमरी कार्ड असते त्याप्रमाणे संगणकाला पण विविध माहिती साठवण्याची साधने आहेत.मेमरी चे दोन प्रकार पडतात.
1) तात्पुरती मेमरी – संगणकात ही तात्पुरत्या स्वरुपात असते.लाईट गेल्यावर ही मेमरी डिलीट होते.
उदा. रॅम
2) कायमस्वरूपी मेमरी – ही मेमरी कायम स्वरुपी राहते.लाईट गेली तरी डिलीट होत नाही.आपण जो पर्यंत ती डिलीट करत नाही तोपर्यंत राहते.
उदा.हार्ड डिस्क,सी. डी,फ्लॉपी
💽💾💿
या प्रकारे सी.पी. यू. शिवाय संगणक अपूर्ण आहे म्हणून त्याला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते.पुढच्या भागात दुसऱ्या भागाची माहिती आपण पाहणार आहोत.