कीबोर्डचे कीज माहिती,keyboard key information

        मित्रांनो आज आपण कीबोर्ड चे बटन व त्यांचे कार्य काय आहे हे आपण पाहणार आहोत.पहिल्या भागात आपण पाहिले की कीबोर्ड चे वेगवेगळे भाग पडतात.प्रत्येक भागात वेगवेगळे बटण असतात.त्यांचे कार्य पण वेगवेगळे असते.आपण प्रथम कीबोर्ड पाहू म्हणजे तुम्हाला बटण पाहून त्यांचे कार्य काय आहे हे समजणे सोपे होईल.


कीबोर्ड चे बटन चे खालील प्रकारे गट पडतात.

1)न्युमारिक किज् – 0 ते 9 हे बटण या गटात येतात व विविध गणिती क्रिया करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

2) अल्फाबेटीकल किज् – A ते Z व a ते z या दोन्ही लिपीचा समावेश असणारी बटण असतात.टायपिंग सारखे कामे करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.

3) फंक्शन किझ – F1 ते F12 ही बटणे विविध संगणकाचे प्रोग्राम असतात ते कार्यान्वित करण्यासाठी वापरले जातात.

4) कर्सर किझ- या गटात वर ⬆️,खाली ⬇️,डावीकडे ⬅️,उजवीकडे ➡️, या प्रकाराची बटणे येतात.याद्वारे कर्सर वर,खाली,उजवीकडे,डावीकडे फिरवता येतो.

5) स्पेसबार किझ- कीबोर्ड वरील हे बटण सर्वात लांबीचे असते.त्याचे कार्य दोन अक्षरांमध्ये हवे तेवढे अंतर सोडता येते.

6) एंटर किझ- संगणकाला एखादी आज्ञा पूर्ण झाल्याचे सांगायचे असल्यास हे बटण दाबून सांगितले जाते.तसेच कर्सर वरील ओळीवरून खालील ओळीवर घेता येतो.

7) एस्केप किझ- कीबोर्डवर उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस हे बटण असते.हे बटण दाबून संगणकाच्या कोणत्याही चालू असलेल्या कामातून बाहेर पडता येते.

8) कॅप्स लॉक किझ- जेव्हा आपल्याला सतत कॅपिटल अक्षरे टाईप करायची असतात तेव्हा या बटणाचा वापर होतो.

9) शिफ्ट किज्- कीबोर्ड वरील कॅपिटल अक्षरे टाईप करायची असेल तर व वरील चिन्हे टाईप करायची असेल तर हे बटण दाबून धरावे सोडू नये हे बटण दाबून धरून कॅपिटल अक्षरे व चिन्हे टाईप करता येतात.

10) बॅकस्पेस किझ- कर्सराच्या डावीकडील अक्षर किंवा चिन्ह खोडण्यासाठी या बटणाचा वापर केला जातो.

11) डिलीट किझ- ज्या प्रमाणे कर्साराच्या डावीकडील अक्षर पुसण्यासाठी बॅकस्पॅस बटण वापरले जाते तसेच कर्सर च्या उजवीकडील अक्षर पुसण्यासाठी डिलीट हे बटण वापरले जाते.

12) कंट्रोल,alt, डिलीट हे बटण एकत्र दाबून संगणक बंद,रिस्टार्ट करता येतो.

            कीबोर्ड वर तीन लाईट असतात.

1) जेव्हा आपल्याला अंक टाईप करायचे असेल तेव्हा न्यूमरिक बटण गटातील Numlock हे बटण दाबावे.मग ही लाईट लागते व अंक टाईप करता येतात.

2) दुसरी लाईट आहे कॅप्सलॉक अक्षरे कॅपिटल काढण्यासाठी हे बटण दाबावे तेव्हा ही लाईट लागते.

3) स्क्रोल लॉक- कीबोर्ड वरील स्क्रोल लॉक हे बटण दाबले असता ही लाईट लागते पेज स्क्रोल करताना याचा वापर केला जातो.

        या प्रकारे कीबोर्ड वरील प्रमुख बटण व त्यांचे कार्य काय आहे हे आपण अभ्यासले आहे.




Leave a Comment