संगणक बूटिंग विषयी माहिती, Computer Booting information in marathi | 102

            संगणक सुरू केल्यानंतर तो वापरण्यायोग्य होई पर्यंत त्यामध्ये ज्या प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रियांना बूटिंग असे म्हणतात.संगणक सुरू केल्यानंतर त्याच्या मॉनिटर वर ज्या इंग्रजी अक्षरे व अंक पटपट पुढे सरकताना दिसतात तेच बूटिंग होत असते.त्यावेळी BIOS (Basic Input Output System)हा प्रोग्राम सुरु असतो.BIOS हा प्रोग्राम सुरु असताना तो CPU, Harddrive, इतर पार्ट तपासून त्याचा एकत्रित काम करण्यासाठी तयारी करून घेत असतो त्यांची तयारी आहे की नाही हे पाहत असतो व त्यासाठी आवश्यक अशी ऑपरेटिंग सिस्टम लोड करत असतो.सर्व माहिती तपासून अज्ञावलीनुसार संगणक वापरण्यायोग्य करतो.अर्थात बूटिंग ला संगणक व्यवस्थित चालण्यासाठी कार्य करणारा ऑपरेटर म्हणता येईल.

बूटिंगचे प्रकार
1) कोल्ड बूटिंग
संगणकाची वीज पुरवठा खंडित केल्यानंतर किंवा वीज गेल्यानंतर पुन्हा सुरू केल्यानंतर किंवा वीज आल्यानंतर
संगणक सुरू झाल्यानंतर परत अक्षरे व अंक वेगाने पुढे सरकताना दिसतात त्यास कोल्ड बूटिंग किंवा हार्ड बूटिंग
असे म्हणतात.
2) वॉर्म बूटिंग
कधी कधी काम करत असताना संगणक मध्येच थांबतो किंवा हँग होतो किंवा त्यामध्ये काहीतरी बिघाड होतो.
तेव्हा CPU वरील reset हे बटण दाबून किंवा Ctrl+Alt+Delete ही तीन किज एकाच वेळी दाबून
संगणक सुरू करता येतो.तेव्हा ही जी प्रक्रिया होते तेव्हा
या प्रक्रियेस वॉर्म बूटिंग असे म्हटले जाते.संगणक बंद करून सुरू करून केल्या जाणाऱ्या बूटिंग पेक्षा वॉर्म 
बूटिंग ची प्रक्रिया जलद होत असते.या बूटिंग ला rebut 
करणे असेही म्हटले जाते.
          याप्रकारे संगणक वापरण्यायोग्य बनवण्यासाठी जी संगणकाद्वारे प्रक्रिया केली जाते त्यास बूटिंग असे 
म्हटले जाते.

Leave a Comment