संगणक माऊस विषयी माहिती, computer mouse information in marathi, computer hardware parts

   संगणक माऊस, Computer mouse information in marathi.

      “मूर्ती छोटी पण कीर्ती महान” असे हे एक छोटे 
साधन आहे.पण माऊस शिवाय संगणकाला आज्ञा देणे अवघड होऊन बसते.संगणकाचे ॲप प्रोग्राम कार्यान्वित 
करण्यासाठी माऊस चा वापर केला जातो.माऊस ठेवण्यासाठी एक कापडी पट्टी असते तिला Mousepad म्हटले  जाते.माऊस एका केबलने सी.पी. यू. ला जोडलेला असतो.माऊस फिरवला की संगणकाच्या मॉनिटरवर ↖️ असा बाण दिसतो.त्याला 
पॉइंटर म्हणतात.माऊस हातात धरून फिरवला की बाण
आपोआप त्या ॲप किंवा प्रोग्रामवर जातो व सी.पी. यू.
ला आज्ञा समजते.
Computer mouse

          हा माऊस आहे.
प्रकार –
1) दोन बटण माऊस – या मध्ये उजवे व डावे बटण,केबल,माऊस अशी रचना असते.
2) तीन बटण माऊस – या मध्ये उजवे,डावे आणि मधले बटण,केबल,माऊस अशी रचना असते.
           माऊस चे बटन एकदा दाबून सोडले की क्लिक 
असा आवाज येतो.म्हणून त्याला माऊसने क्लिक करणे 
असे म्हटले जाते.माऊस चे बटन दोनदा दाबले की डबल क्लिक होते.डावे बटण लेफ्ट क्लिक व उजवे बटण राईट
क्लिक म्हटले जाते.मधील बटण मॉनिटर वर पेज खाली वर घेण्यासाठी वापरतात.
           अशा प्रकारे संगणकाचे हे लहान साधन कामाने 
खूप मोठे आहे.लॅपटॉप वर सुद्धा माऊस जोडून काम करता येते.एक प्रकारे हे काम सोपे करणारे साधन आहे.
माणसाच्या आज्ञा माऊस संगणकाला देते म्हणून त्यास इनपुट साधन देखील म्हटले जाते.

Leave a Comment