संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम (OS), ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, Computer Operating System

          संगणक ऑपरेटिंग सिस्टम/Computer Operating System

               आपण संगणक हाताळत असताना विविध कार्य,क्रिया,खेळ खेळतो.हे सर्व आपण करत असतो असे आपणास वाटते पण यामागे एक वेगळाच सूत्रधार असतो तो सर्व क्रिया घडवून आणतो.म्हणून संगणाकामध्ये योग्य त्या प्रक्रिया घडवून आणतो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात.जसे आपल्या शरीराचे ऑपरेटिंग मेंदू करतो.

ऑपरेटिंग सिस्टम  – ऑपरेटिंग सिस्टम हा एक 
अज्ञावलींचा संच आहे.हा प्रोग्राम संगणकाशी संवाद साधतो.मेंदुप्रमाने सर्व प्रक्रियांचे क्रमवार नियंत्रण करणे व त्यांमध्ये कोणताही अडथळा येऊ न देणे ही कामे करतो.संगणक सुरू करताना त्यामध्ये प्रथम ऑपरेटिंग सिस्टम लोड करावी लागते त्याशिवाय संगणक कार्य करत नाही.जसे की मोबाईल मध्ये अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टम असते त्याप्रमाणे संगणकामध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज, डॉस, मॅक ओएस,लिनक्स या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध आहेत.सर्वात जास्त प्रमाणात वापरात येणारी ऑपरेटिंग सिस्टम ही आजघडीला मायक्रोसॉफ्ट विंडोज ही आहे.त्याचे विंडोज एक्सपी ते विंडोज 13 पर्यंत प्रकार आले आहेत.

ऑपरेटिंग सिस्टम चे कार्य –
1) संगणकाचे इनपुट साधने यांद्वारे आलेली माहिती ओळखणे.उदा.कीबोर्ड,माऊस
2) संगणाकमध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती माहिती संगणकाच्या आऊटपुट साधनांवर दिसते म्हणजेच ती माहिती मॉनिटर व टाईप होऊन प्रिंटरद्वारे आपणास मिळते.
3) ऑपरेटिंग सिस्टम ही संगणकाच्या सर्व साधनांवर लक्ष देते आणि त्यांच्याकडून योग्य त्या प्रकारे कामे करून घेते.
             या प्रकारे संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम कार्य करत असते पुढील लेखात विविध ऑपरेटिंग सिस्टम विषयी माहिती पाहू.

3 thoughts on “संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम (OS), ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, Computer Operating System”

Leave a Comment